मायक्रोमॅक्सचा आणखी स्वस्त स्मार्ट फोन बाजारात

भारतातील सर्वात मोठी हॅण्डसेट निर्मात कंपनी मायक्रोमॅक्सने आणखी एक स्मार्ट फोन बाजारात आणला आहे. या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्ट फोनचं नाव Bolt A66 आहे. हा फोन फक्त ६ हजार रूपयांना मिळणार आहे

Updated: Jan 15, 2014, 04:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतातील सर्वात मोठी हॅण्डसेट निर्मात कंपनी मायक्रोमॅक्सने आणखी एक स्मार्ट फोन बाजारात आणला आहे. या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्ट फोनचं नाव Bolt A66 आहे. हा फोन फक्त ६ हजार रूपयांना मिळणार आहे
Bolt A66 मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या साईटचं शिपमेंट टाईम म्हणजेचं डिलिवरीचा काळ ७ ते १० वर्किंग डेज आहेत. हा फोन एंड्रायडच्या 4.1 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

मायक्रोमॅक्सच्या Bolt A66 मध्ये काय विशेष आहे
- 4.4 इंचचा फुल टच स्क्रीन डिस्प्ले
- 1 GHz चा प्रोसेसर
- 512 MB ची रॅम
- 512 MB की इंटरनल स्टोरेज
- 32 स्टोरेज एसटी कार्डच्या मदतीने वाढवता येते
- 3G नेटवर्कला सपोर्ट
- एलईडी फ्लॅश के सोबत 2 मेगापिक्सलचा कॅमेरा
- 1500 mAh ची बॅॉरी, 4.5 टॉक टाइम
- फोनच्या बॅटरीचं टायमिंग ११६ तास, कंपनीचा दावा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.