www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरनं गेल्या आठवड्यात आपल्या टूजी डेटा प्लान्सच्या दरांत वाढ केलीय. इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय.
टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉल्यूम आणि मार्जिन वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. दिल्ली आणि मुंबईच्या सर्कल्समध्ये हे नवीन दर आकारले जाणार आहेत. या नवीन प्लाननुसार भारती एअरटेलच्या ग्राहकांना टूजी डेटा प्लानसाठी 125 रुपये द्यावे लागतील... यामध्ये त्यांना केवळ 525 एमबी डेटा फ्री मिळेल. तर एक जीबी डेटासाठी 154 रुपये द्यावे लागतील.
आयडिया आणि व्होडाफोननं ऑफरिंग प्लानमध्ये जवळजवळ सारखेच बदल केलेत. यापुढे व्होडाफोन मुंबई आणि दिल्लीच्या सर्कल्समध्ये एका महिन्यासाठी एक जीबी डेटासाठी 155 रुपये आकारणार आहे. याअगोदर व्होडाफोनमध्ये एक जीबी डेटासाठी 125 रुपये आकारले जात होते.
सूत्रांनी दिलेल्या या माहितीनंतर भारती एअरटेल आणि व्होडाफोन इंडियानं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. देशात 90 करोडहून अधिक मोबाईल फोनमध्ये जवळजवळ 90 टक्के लोक प्री-पेड प्लान्स वापरतात.
गेल्या काही महिन्यांपासून टेलिकॉम सेक्टर थोड्या अडचणीत सापडल्याचं दिसतंय. किंमतीच्या युद्धात आणि प्रतिस्पर्ध्यांमध्ये टीकून राहण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपले कॉल रेट कमी केले होते. परंतु, नंतर मात्र गेल्या 5-6 सत्रात कंपन्यांनी आपल्या किंमतीत वाढ केलीच पण डिस्काऊंटमध्ये हात आखडता घेतलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.