भारताचं आव्हान संपलं, वर्ल्डकपमधून घरी रवानगी

आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने पाच गडी गमावत १६ षटकांच्या समाप्तीपर्यंत ११६ धावा केल्या.

Updated: Oct 2, 2012, 10:34 PM IST

www.24taas.com, कोलंबो
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाच्या १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने १७ षटकांच्या समाप्तीपर्यंत पाच गडी गमावत १२१ धावा केल्या. आणि इंडियाचं सेमीफायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेला १२१ धावात न रोखू शकल्यामुळे रनरेटच्या आधारावर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचली आहे.
टीम इंडियाने सहा गडी गमावत २० षटकांत १५२ धावा केल्या. सुरेश रैना शेवटच्या चेंडूवर धाव बाद झाला. त्याने शानदार ४५ धावांचे योगदान दिले. महेंद्रसिंग धोनी २३ धावा काढून नाबाद राहिला. टीम इंडियाची टॉप ऑर्डर अतिशय वाईट पद्धतीने तंबूत परतली. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी भारताला ३२ हून अधिक धावांनी विजय संपादन करावा लागणार आहे. त्यासाठी मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने पाच गडी गमावत १६ षटकांच्या समाप्तीपर्यंत ११६ धावा केल्या. सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी क्रिजवर आहे. टीम इंडियाची टॉप ऑर्डर अतिशय वाईट पद्धतीने तंबूत परतली. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी भारताला ३२ हून अधिक धावांनी विजय संपादन करावा लागणार आहे.
त्यासाठी मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. पीटरसनने पुन्हा एकदा भारताला झटका दिला. पीटरसनने रोहित शर्माला पायचित बाद केले. त्याने २७ चेंडूत दोन चौकार लगावत २५ धावा केल्या. युवराजसिंग फार्मात आला असे वाटत असतानाच त्याचाही वेस्ट इंडिज गोलंदाज मॉर्केलने त्रिफळा उडविला. युवीने दोन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने १५ चेंडूत २१ धावा केल्या.
दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटू रॉबीन पीटरसनने वीरेंद्र सेहवागचा त्रिफळा उडविला. पिटरसनच्या गोलंदाजीवर सेहवागने एक शानदार षटकार लगावल्यानंतर दुस-याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. १४ चेंडूत त्याने एक षटकार आणि एक चौकार लगावत १७ धावा केल्या.