कटक : अनुभवी युवराज सिंगने गुरूवारी झळकविलेल्या १५० धावांच्या खेळीला आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ खेळी पैकी एक म्हटले आहे.
युवराजने इनिंग संपल्यावर दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, माझ्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी पैकी एक आहे. गेल्या वेळी मी २०११ मध्ये शतक लगावले होते. मी माझ्या खेळीने खूश आहे. आम्ही एक चांगली भागीदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. मी जास्त जोखीम घेऊ इच्छित नव्हतो. तसेच हवेत शॉर्ट खेळणे टाळत होतो. संपूर्ण देशांतर्गत सामन्यात बॉलला चांगल्याप्रकारे हीट करत होतो. मला बँटिंग कोच संजय बांगरने मोठे शॉट खेळायला सांगितले होते.
त्याने सांगितले की संजय बांगरशी चर्चा केल्यानंतर त्याने सांगितले की मी ज्या पद्धतीने चेंडूला मारत होतो, त्यानुसार मोठे शॉट खेळले पाहिजे. पाच फिल्डरच्या नियमांनुसार मिड ऑन आणि मिड ऑफचे खेळाडू पुढे उभे असतात. पहिल्या दहा ओव्हर्समध्ये गोलंदाजांना इतकी मदत मिळत नव्हती.
धोनीने मला शतक बनविण्यासाठी मदत केली. युवराज म्हटला की धोनी भारतासाठी चांगला कर्णधार राहिला आहे. पण माही जेव्हा कर्णधार नसतो तेव्हा तो बिनधास्त फलंदाजी करतो.
युवराजने या सामन्यात १५० धावांची खेळी केली. यापूर्वी त्याने २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध १३९ धावांची खेळी केली होती. युवराज आणि धोनीने चौथ्या विकेटसाठी २५६ धावा जोडल्या. इंग्लंड विरूद्ध हा कोणत्याही संघाचा चौथ्या विकेटसाठी विक्रम आहे. ही वन डेतील चौथ्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची भागिदारी आहे. या दोघांनी वन डेमध्ये दहाव्यांदा शतकी खेळी केली आहे. ही पाचवी भारतीय जोडी आहे, ज्यांनी दहा वेळा शतकीय भागीदारी केली आहे. सौरव गांगुली आणि तेंडुलकरने सर्वाधिक २६ वेळा शतकीय भागीदारी केली आहे.
धोनीने भारताच्या भूमीवर ४००० धावा करण्याचे विक्रम केला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने हा विक्रम केला आहे. त्याच्या नावावर ६९७६ धावा आहे. त्यामुळे धोनी अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज आहे.