विरू, जहीर, युवी, भज्जीचं भारतीय संघात पुनरागमन?

बीसीसीआय भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी विरेंद्र सेहवाग, जहीर खान, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना संघात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. 

Updated: May 16, 2015, 04:32 PM IST
विरू, जहीर, युवी, भज्जीचं भारतीय संघात पुनरागमन? title=

मुंबई : बीसीसीआय भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी विरेंद्र सेहवाग, जहीर खान, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना संघात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. 

या दिग्गजांना संघात स्थान देऊन बीसीसीआय या सिरिजला त्यांचा निरोप समारंभ करण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर संघाला अनुभवी खेळाडूंची साथही मिळेल. सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली या दौऱ्यात जाण्यास उत्सुक नाही. त्याला आरामासाठी वेळ हवा आहे. 

बांगलादेश दौऱ्यासाठीच्या भारतीय संघाची घोषणा २० मे रोजी होणार आहे. हा दौरा १० जून ते २४ जून दरम्यान खेळला जाणार आहे. भारत बांगलादेश दौऱ्याला महत्त्व देत नाही आणि प्रत्येक वेळी या दौऱ्यांत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. मात्र, या नेमकं उलटं होणार आहे. बीसीसीआयचे अधिकारी यावर स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत. मात्र, स्पष्टपणे नकारही देत नाहीत. अंतिम निर्णय मात्र निवड समितीचा असणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही खेळाडूंची निवड टेस्टसाठी आणि काहींची निवड वन-डेसाठी केली जाणार आहे. मात्र, बीसीसीआई गेल्या काही दिवसातील बांगलादेशचं प्रदर्शन पाहता, कोणताही धोका पत्करणार नाही. 

या चार खेळाडूंची निवड झाली तरीही त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित नक्कीच होतील. आयपीएलमध्ये जहीर खान आणि हरभजन सिंग यांचं प्रदर्शन चांगलं होतं. मात्र, युवराज आणि सेहवागचं प्रदर्शनाच्या आधारावर त्यांची या दौऱ्यासाठीची निवड योग्य ठरेल का? हाही प्रश्नच आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.