युनूस खानने सचिन तेंडुलकर आणि ब्रॅडमन यांना मागे टाकलं

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर युनूस खान याने असा विक्रम केला जो क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. 

Updated: Jul 7, 2015, 05:42 PM IST
 युनूस खानने सचिन तेंडुलकर आणि ब्रॅडमन यांना मागे टाकलं title=

पाल्लेकल : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर युनूस खान याने असा विक्रम केला जो क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. 

कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात सर्वाधिक शतक बनविण्याचे रेकॉ़र्ड युनूस खान याच्या नावावर झाले आहे. श्रीलंका विरूद्ध युनूस खानने चौथ्या डावात आपले पाचवे शतक साजरे केले. 

या यादीत भारताचा सुनील गावस्कर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग, वेस्ट इंडिजचा रामनरेश सारवन आणि साऊथ आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ यांनी प्रत्येकी चार शतक झळकावले आहेत. हे सर्व आता दुसऱ्या स्थानावर आहेत. 

आपल्या या खेळीत युनूस खानने टेस्ट क्रिकेटमधील ३० वे शतक ठोकले. त्यामुळे तो डॉन ब्रॅडमॅन यांच्या २९ शतकांच्या रेकॉर्डच्या पुढे गेला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.