'चिकू भैय्या' सोडून जाणार म्हणून शेजारी नाराज!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि वाईस कॅप्टन विराट कोहली सध्या आपला मुक्काम गुडगावमधील एका नव्या घरात हलवणार असल्याचं समजतंय. पण, यामुळे सध्या तो राहत असलेल्या ठिकाणचे शेजारी मात्र हिरमुसलेत.

Updated: Jul 7, 2015, 11:07 AM IST
'चिकू भैय्या' सोडून जाणार म्हणून शेजारी नाराज! title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि वाईस कॅप्टन विराट कोहली सध्या आपला मुक्काम गुडगावमधील एका नव्या घरात हलवणार असल्याचं समजतंय. पण, यामुळे सध्या तो राहत असलेल्या ठिकाणचे शेजारी मात्र हिरमुसलेत.

दिल्लीच्या पश्चिम विाहर भागातील मीराबाग के ए - ९२ मध्ये सध्या विराट कोहली राहतोय. इथं त्याचे शेजारी त्याला 'चिकू' नावानंच बोलावतात. इथली मुलंही त्याला 'चिकू भैय्या' याच नावानं ओळखतात. विराटच्या आईचा या सोसायटीच्या विकासात महत्त्वाचं योगदान राहिलंय. 

इथं राहणारे रामलाल नागपूल म्हणतात, आमच्या कॉलनीचं नाव 'विराट विहार' आहे कारण इथं विराट कोहली राहतो. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आमच्या शेजारी राहतो. 

विराटचे शेजारीच नाही तर त्याच्या गेटवरचा सेक्युरिटी गार्डही यामुळे नाराज आहे. विराटच्या निर्णयामुळे आम्ही सर्व दुखी आहोत. या कॉलनीत आम्ही सर्व एका कुटुंबाप्रमाणे राहतो. पण, जेव्हा एखादा कुटुंबातील सदस्य कुटुंब सोडून जातो तेव्हा दु:ख तर होतंच. 

विराट हा एक सेलिब्रिटी आहे. तो कॉलनीत राहत असूनही आम्ही मोठ्या मुश्किलीनं त्याला भेटू शकतो. कुणालाही त्याच्या येण्याची किंवा जाण्याची काहीच माहिती नसते. हो... पण, तो इथं राहत होता म्हणून आमच्या सोसायटीचं नाव तरी झालं, असं याच भागात राहणारे एस आर कपूर म्हणतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.