अॅडलेड : टीम इंडाया आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे रविवारच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकविरोधात होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये येणारे दडपण हाताळण्यासाठी आमचे खेळाडू सज्ज आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. पाकविरुद्ध वर्ल्डकप मोहिमची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियातील सर्वच खेळाडूंनी गुरुवारी सरावादरम्यान चांगलाच घाम गाळला. सकाळी सेंट पीटर्स मैदानावर संपूर्ण संघाने नेट प्रॅक्टिस केली. नंतर अॅडिलेड ओव्हलच्या इन्डोअर सभागृहात दोन आणि तीन खेळाडूंचे गट तयार करून ट्रेनर व्ही. पी. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व्यायामाचे धडे गिरविले.
भारतीय खेळाडूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना शांत चित्ताने खेळणे शिकवावे लागत नाही. बहुतेक सर्वच खेळाडूंना पुरेसा अनुभव आहे. अनेक एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. शिवाय, हजारो प्रेक्षकांसमोर खेळण्याची आणि दडपण पेलण्याची क्षमताही त्यांच्यात आहेच, त्यामुळे रविवारी चांगले प्रदर्शन आमच्याकडून होईल, असे धोनी म्हणाला.
वर्ल्डकप स्पर्धेत पाकबरोबरच्या लढतीत आतापर्यंत भारताने एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. यंदाच्या स्पर्धेतही ही विजयी मालिका कायम राखण्याचे नाही. आमच्यावर कुठलेही आकडे आणि विक्रमांची मी चिंता करत नाही. किंबहुना, या सामन्यामधून आपल्या कामगिरीची गुणवत्ता कशी वाढवता येईल, याकडे लक्ष असेल, असे धोनी म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.