ख्रिस गेलवर जागतिक पातळीवर बंदी घाला - चॅपेल

महिलांशी असभ्य वर्तन केल्याने ख्रिस गेल सध्या वादात आला आहे.

Updated: Jan 8, 2016, 11:31 PM IST
ख्रिस गेलवर जागतिक पातळीवर बंदी घाला - चॅपेल title=

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक इयान चॅपेल यांनी, वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याच्यावर जगभर बंदी घालण्याची मागणी केली आहे. महिलांशी असभ्य वर्तन केल्याने ख्रिस गेल सध्या वादात आला आहे.

‘तुझ्यासाठीच मी आजची खेळी केली. तुझे डोळे मला पाहायचे होते. संध्याकाळी ड्रिंक्स घ्यायला आपण भेटू या. तू लाजू नकोस' असं ख्रिस गेल, नेटवर्क टेनची पत्रकार मेल मॅकलाफलिन हिच्याशी मुलाखत देताना बोलला. 

गेलच्या असभ्य वर्तनाबद्दल त्याला बीबीएलच्या वतीने त्याला दहा हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील पुढील मोसमासाठी गेल याला खेळण्याची संधी मिळणेही दुरापास्त होऊ शकते. 

बीबीएलच्या खेळाडूंच्या करारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया‘ला आहे. तसेच, संघ व्यवस्थापनातील एका महिलेसमोर टॉवेल सोडून असभ्य वर्तन केल्याचाही आरोप यापूर्वी ख्रिस गेलवर होता.