भारतीय महिला आणि पुरूष कबड्डीसंघानी पटकावली सुवर्णपदकं

भारताने कबड्डीत महिला आणि पुरुष या दोन्ही गटांत सुवर्णपदकं मिळवली आहेत इन्चिऑन एशियाडमध्ये भारताच्या कबड्डीपटूंनी ही सूवर्णपदकं पटकावली.

Updated: Oct 3, 2014, 05:24 PM IST
भारतीय महिला आणि पुरूष कबड्डीसंघानी पटकावली सुवर्णपदकं title=

इन्चिऑन : भारताने कबड्डीत महिला आणि पुरुष या दोन्ही गटांत सुवर्णपदकं मिळवली आहेत इन्चिऑन एशियाडमध्ये भारताच्या कबड्डीपटूंनी ही सुवर्णपदकं पटकावली.

 पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात इराणने भारताला कडवी टक्कर दिली. मात्र भारताने इराणचं आव्हान मोडून शानदार विजयाची नोंद केली आणि विजयादशमीला सुवर्णपदकाची कमाई केली.
 
सामन्याच्या सुरुवातीपासूनच इराणने आक्रमक खेळ केला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत भारत 13-21 असा पिछाडीवर होता. मात्र कर्णधार राकेश कुमारचा झुंजार खेळ आणि अनूप, जसवीरनं दिलेली साथ यामुळे भारताने मध्यंतरानंतर शानदार पुनरागमन केलं. अखेरची काही सेकंद बाकी असताना भारताने 27-25 असा विजय मिळवला.
 
एशियाडमध्ये भारताचं हे पुरुषांच्या कबड्डीतील सातवं सुवर्णपदक आहे. 1990 मध्ये कबड्डीचा एशियाडमध्ये समावेश झाल्यापासून प्रत्येक वेळी भारताने सुवर्णपदक मिळवलं आहे.
 
 त्याआधी भारतीय महिलांनीही कबड्डीत सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात भारताने इराणच्या संघाचा 31-21 ने पराभव करुन सुवर्णपदक पटकावलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.