कटक : कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावरील ओझे काहीसे हलके झालेय. त्यामुळे धोनी सध्या त्याचा खेळ भरपूर एन्जॉय करतोय.
कटकमधील दुसऱ्या वनडेदरम्यान असाच काहीसा हलकाफुलका प्रसंग पाहायला मिळाला. जेव्हा बुमराहने मॉर्गनला धावचीत केले तेव्हा त्याची बाद करण्याची पद्धत पाहून धोनीला काही हसू आवरले नाही.
त्यावेळी इंग्लंडला १० चेंडूत २८ धावा हव्या होत्या. त्यावेळी मॉर्गनला बाद करताना जर बुमराहचा थ्रो चुकला असता तर ते भारताला चांगले महाग पडले असते. कारण मॉर्गन फॉर्ममध्ये होता आणि तो मैदानावर असता तर इंग्लंडला सामना जिंकणे तितकेसे कठीण झाले नसते. त्यामुळेच धोनीला बुमराहच्या या गोष्टीवर हसू आले आणि मैदानावर तो आपले हसू आवरु शकला नाही.
Eoin Morgan's entertaining century that almost won England the match https://t.co/IJmQolWQ6U #BCCI #INDvENG
— DC Sports (@_DCSports) 21 January 2017