'थर्ड अंपायर'ला विराटनं घेतलेला 'क्लीन कॅच' दिसला नाही?

मीरपूर वनडे मॅच दरम्यान तमीम इकबाल याला 'नॉट आऊट' देण्याचा निर्णय वादात अडकलाय.

Updated: Jun 23, 2015, 01:39 PM IST
'थर्ड अंपायर'ला विराटनं घेतलेला 'क्लीन कॅच' दिसला नाही? title=

मीरपूर : मीरपूर वनडे मॅच दरम्यान तमीम इकबाल याला 'नॉट आऊट' देण्याचा निर्णय वादात अडकलाय.

इंग्रजी वर्तमानपत्र हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, मॅग्नीफायर इमेजच्या साहाय्यानं हे सरळ सरळ दिसतंय की विराट कोहलीनं इकबालचा कॅच योग्य पद्धतीनं घेतला होता... आणि हा क्लीन कॅच होता. परंतु, फिल्ड अंपायरनं हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला होता... आणि थर्ड अंपायरनं तमीमला 'नॉट आऊट' जाहीर केलं होतं.  

त्याचं झालं असं की, विराट कोहलीनं बांग्लादेशचा ओपनर तमीम इकबाल याचा एक कॅच घेतला होता. यावर, थर्ड अंपायरनं तमीमला नॉट आऊट करार दिलं. विराटनं मात्र या निर्णयावर आक्षेप नोंदवत फिल्ड अंपायरशीदेखील चर्चा केली होती. 

दुसऱ्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर तमीम इकबालनं 'मिड ऑफ'कडे एक शॉट खेळला होता... आणि हीच कॅच विराटनं घेतली होती. कॅच घेताच त्यानं 'आऊट'साठी अंपायरकडे अपील केलं. फिल्ड अंपायरनं हा फैसला थर्ड अंपायरकडे सोपवला... आणि थर्ड अंपायर अनीसुर रहमाननं 'बेनिफिट ऑफ डाऊट'चा आसरा घेत निर्णय बॅटसमनच्या बाजुनं सोपवला. 

थर्ड अंपायरच्या या निर्णयानंतर विराट नाराज दिसला. एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, टीव्हीवर या दरम्यान मॅग्नीफायर रिप्ले दाखवण्यात आलाच नव्हता... यामध्ये तमीम आऊट असल्याचं सरळ सरळ दिसत होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.