धोनीला सन्मान आणि वेळ द्या : गांगुली

माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीवर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीला सन्मान देण्याच आवाहन केलंय. त्यानं कर्णधार या नात्यानं वनडेमध्ये अनेक रेकॉर्ड्स केली आहेत, म्हणून धोनीला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे असंही म्हटलंय.

Updated: Jun 23, 2015, 01:13 PM IST
धोनीला सन्मान आणि वेळ द्या : गांगुली title=

नवी दिल्ली : माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीवर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीला सन्मान देण्याच आवाहन केलंय. त्यानं कर्णधार या नात्यानं वनडेमध्ये अनेक रेकॉर्ड्स केली आहेत, म्हणून धोनीला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे असंही म्हटलंय.

 

बांगलादेशसोबत दुसऱ्या वन-डेमध्ये भारताच्या पराभवानंतर रविवारी भावनेच्या भरात 'आपल्या निवृत्तीमुळे जर क्रिकेटला चांगले दिवस येणार असल्यास आपण त्यासाठी तयार आहे.' असं म्हटलं होतं

 

गांगुलीनं सोमवारी एका न्यूज चॅनेलशी बोलताना म्हटलंय, 'त्यानं परिस्थितीनुसार ही गोष्ट बोलली असून तो पराभवामुळे अस्वस्थ झालाय. झालेला प्रकार तिथंच थांबवा आणि विचार करा. धोनीला कमी लेखू नका. त्याने बरेच विक्रम केलेत. त्याला त्याचा वेळ द्या.'

 

गांगुलीला विचारण्यात आलं की 2016 टी-20 विश्वचषकापर्यंत धोनीला कर्णधार ठेवावं का?, त्यावर गांगुली म्हणाला की, 'हा कोणत्याही एका व्यक्तीचा निर्णय नाही, थोडा धीर धरा, ही मालिका समाप्त होऊ द्या, अशाप्रकारचे निर्णय एका रात्रीत होत नसतात.'

 

'जो निर्णय होईल तो पूर्ण विचार करून घेण्यात येईल. बीसीसीआयचे उच्चपदस्थ हा निर्णय घेतील. त्यांना पुरेसा वेळ द्या.' असंही तो यावेळी म्हणाला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.