मुंबई : क्रिकेटमध्ये जर्सी नंबरचा ओळख 1999 वर्ल्डकपमध्ये झाली. टीममधील 15 सदस्यांना 2 ते 15 अंकामधील नंबर मिळत होता. कर्णधार १ नंबरची जर्सी घालायचा. फक्त दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार हेंसी क्रोंजे सोडून जे 5 नंबरची जर्सी वापरायचे. आयसीसीने नंतर संख्याची मर्यादा वाढवून ० ते ९९ ठेवली.
अनेक खेळाडूंचे असे जर्सी नंबर आहेत जे चाहत्यांच्या लक्षात राहिले. काही नंबर पंडितांना विचारुन घातले गेले तर कोणी आपल्या सर्वश्रेष्ठ टेस्ट स्कोरला स्वत:चा जर्सी नंबर ठेवला. राहुल द्रविडने तर एकदम सहज सांगितलं होतं की त्यांने त्याच्या पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवण्य़ासाठी त्याच्या जर्सीवर तो नंबर टाकला.
333 आधी गेलच्या जर्सीचा नंबर 00 होता. पण आयसीसीने 00 या नंबरवर बंदी टाकली. पण एका भारतीय खेळाडूने अनेकांचं लक्ष स्वत:कडे केंद्रित केलं ते म्हणजे भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने. विरुचं एकच म्हणणं होतं बॉल बघा आणि प्रहार करा.
नंबरच्या भविष्यवाणीवर विरुला विश्वास नव्हता. तो स्वत:च्या दमवर रन करण्यावर विश्वास ठेवायचा. विरुच्या अनेक स्फोटक खेळी आपण देखील मैदानावर पाहिल्या आहेत जेव्हा त्याच्या जर्सीवर कोणताच नंबर नसायचा.