मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरतो. काही वर्षांपासून हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या फक्त इवेंट मॅचमध्ये एकमेकांविरोधात खेळत आहेत.
मागील काही वर्षांपासून पाकिस्तानचा वनडे क्रिकेटमधला फॉर्म खराब होत चालला आहे. पाकिस्तानच्या या खालावत चाललेल्या कामगिरीमुळे ब्रॉडकास्टर्सला मोठा झटका लागला आहे.
पाकिस्तानने भारताला मागे टाकत टेस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला. पण यामुळे त्यांची वनडेमध्ये देखील कामगिरी सुधारेल अशी आशा होती पण तसं काहीच नाही घडलं. आता पाकिस्तानकडे कोणताही अशी संधी दिसत नाही ज्यामुळे ते वापसी करु शकतील.
२०१९ ला इंग्लंडमध्ये वर्ल्डकप खेळला जाणार आहे. सर्व ब्रॉडकास्टर्सला याच गोष्टीची चिंता आहे की, जर पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर झाला तर त्यांना मोठा फटका बसू शकतो.
भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० वर्ल्डकप सामना जो कोलकात्यात खेळला गेला होता तेव्हा ८ कोटी ३० लाख लोकांनी तो सामना पाहिला होता. विश्वभरात हा सामना पाहिला जातो त्यामुळे याचा फायदा ब्रॉडकास्टर्सला होतो.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव रिचर्डसन यांनी म्हटलं आहे की, या दोन संघांमधला सामना अशा प्रकारे ठरवला जातो की जसा मोठा इवेंन्ट आहे. चँपियंस ट्राफी, २०-ट्वेंटी वर्ल्डकप आणि ५० ओव्हरच्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एक दुसऱ्याविरोधात खेळू शकेल असेच सामने ठरवले जातात.
पाकिस्तान एकदिवसीय सामन्यांच्या रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर आहे. वेस्टइंडीज पेक्षा ते १० अकांनी मागे आहेत. सध्या सुरु असलेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सिरीजमध्ये जर रविवारी देखील पाकिस्तानचा पराभव झाला तर ३० सप्टेंबर २०१७ जी २०१९ वर्ल्डकपसाठी पात्र होण्याची शेवटची तारीख आहे त्याआधी टॉप ८ मध्ये येणे पाकिस्तानला कठीण होऊन जाईल.
आयसीसीने यावर्षी जाहीर केलं होतं की वर्ल्डकपमध्ये फक्त १० संघ खेळतील. त्यानंतर इतर देशांनी यावर नाराजी दर्शवत म्हटलं होतं की आयसीसी त्यांना संधी नाही देत आहे. पाकिस्तान मागच्या काही वर्षांपासून अनेक सामने गमावले आहेत. जर पाकिस्तान टॉप ८ मध्ये जागा नाही मिळवू शकला तर त्यांना त्यासाठी 2018 मध्ये बांग्लादेशमध्ये पात्र होण्यासाठी सामना खेळावा लागेल.
पाकिस्तानला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासोबत सीरीज खेळायची आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या चँपियंस ट्राफी पाकिस्तानसाठी एक शेवटची संधी असू शकते.