साक्षीने घेतली सेहवागची भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत कांस्यपदक कमावणारी साक्षी मलिक देशात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. घरी परतल्यानंतर साक्षीने सेहवागला भेटण्याची इच्छा ट्विटरवरुन व्यक्त केली होती. 

Updated: Aug 27, 2016, 05:04 PM IST
साक्षीने घेतली सेहवागची भेट title=

मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत कांस्यपदक कमावणारी साक्षी मलिक देशात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. घरी परतल्यानंतर साक्षीने सेहवागला भेटण्याची इच्छा ट्विटरवरुन व्यक्त केली होती. 

सेहवागनेही लगेचच साक्षीची भेट घेत तिची इच्छा पूर्ण केली. साक्षीची भेट घेतल्यानंतर त्याने ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला. 

साक्षीला भेटून खूप आनंद झाला. तिने माझ्याशी कुस्ती केली नाही त्यामुळे तिला आरामात शुभेच्छा देता आल्या, असे सेहवागने ट्विटरवर लिहिले. 

सेहवागची भेट घेतल्यानंतर साक्षीनेही ट्विरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. वीरेंद्र सेहवाग भेटल्याबद्दल धन्यवाद. तुमचे व्यक्तिमत्व खूपच छान आहे, असे साक्षी म्हणाली.