विराट कोहलीनं केली सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 122 रनची झुंजार खेळी केली.

Updated: Jan 15, 2017, 08:47 PM IST
विराट कोहलीनं केली सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी title=

पुणे : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 122 रनची झुंजार खेळी केली. 105 बॉलच्या या खेळीमध्ये कोहलीनं 8 फोर आणि 5 सिक्स मारल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कोहलीची ही 27वी सेंच्युरी आहे. या सेंच्युरीनंतर विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरनं 17 सेंच्युरी झळकावल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये पाठलाग करताना एवढ्या सेंच्युरी आत्तापर्यंत कोणीच झळकावल्या नाहीत. पाठलाग करताना 17 सेंच्युरी झळकवताना सचिन तेंडुलकरला 232 इनिंग लागल्या होत्या तर कोहलीनं मात्र 96 इनिंगमध्येच ही कामगिरी केली आहे.