मेलबर्न : भारतात होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर करण्यात आली आहे. 16 जणांच्या या टीममध्ये चार स्पिनर आणि आयपीएलचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनं टीममध्ये कमबॅक केलं आहे तर लेग स्पिनर मिचेल स्वेप्सनला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. स्वेप्सनबरोबर नॅथन लायन, ऍश्टन अगर आणि स्टीव्ह ओकीफी या स्पिनरना कांगारूंच्या टीममध्ये स्थान मिळालं आहे. चार स्पिनरबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये तीन फास्ट बॉलर आणि दोन ऑल राऊंडरचा समावेश करण्यात आला आहे.
2004नंतर ऑस्ट्रेलियाला भारतात एकही मॅच जिंकता आलेली नाही. त्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या टीमपुढे भारताला भारतात हरवण्याचं तगडं आव्हान असणार आहे. या सीरिजची पहिली मॅच 23 फेब्रुवारीला पुण्यात, दुसरी मॅच 4 मार्चला बैंगलुरुमध्ये, तिसरी मॅच 16 मार्चला रांचीमध्ये तर चौथी आणि शेवटची टेस्ट धर्मशाळा इथे 25 मार्चपासून सुरु होणार आहे.
स्टीव्ह स्मिथ(कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, ऍश्टन अगर, जॅकसन बर्ड, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, जॉस हेझलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह ओकीफी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड(विकेटकीपर)