...तर विराट कोहली बनवणार अजब रेकॉर्ड!

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार मॅच सीरिजमधली शेवटची टेस्ट मॅच शनिवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये होतेय. कॅप्टन विराट कोहलीच्या खेळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे... असं असलं तरी त्यातही विराटसाठी हा एक अजब रेकॉर्ड ठरू शकतो. 

Updated: Mar 24, 2017, 07:27 PM IST
...तर विराट कोहली बनवणार अजब रेकॉर्ड! title=

धर्मशाळा : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार मॅच सीरिजमधली शेवटची टेस्ट मॅच शनिवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये होतेय. कॅप्टन विराट कोहलीच्या खेळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे... असं असलं तरी त्यातही विराटसाठी हा एक अजब रेकॉर्ड ठरू शकतो. 

खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे कोहली मॅचमधून बाहेर पडू शकतो. असं घडलं तर २०११ ही पहिलीच वेळ असेल जेव्हा विराट एखाद्या टेस्टमॅचमधून बाहेर असेल. 

टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यानंतर केवळ एकदाच विराट प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवू शकलेला नाही. पण, त्यानंतर विराट पुन्हा मैदानात आला तो परत मागे वळून न पाहण्यासाठीच... २० जून २०११ मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध सबीना पार्क किंग्सटनमध्ये विराट पहिली टेस्ट मॅच खेळला होता. 

विराट टीम इंडियासाठी सलग ५४ टेस्ट मॅच खेळलाय. ज्यामध्ये त्यानं ५१.४० च्या सरासरीनं ४४२१ रन्स ठोकलेत. 

उल्लेखनीय म्हणजे, भारताकडून सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्ड सुनील गावसकरच्या नावावर आहे. गावसकर यांनी १०६ टेस्ट मॅच खेळल्यात.