'धोनीचा निर्णय सर्वांसाठी धक्का देणारा'

टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय,  महेंद्रसिंह धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय सर्वांसाठीच धक्का देणारा होता. त्याच्या या निर्णयाची आम्हाला कल्पनाही नव्हती.

Updated: Jan 5, 2015, 12:24 PM IST
'धोनीचा निर्णय सर्वांसाठी धक्का देणारा' title=

सिडनी : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय,  महेंद्रसिंह धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय सर्वांसाठीच धक्का देणारा होता. त्याच्या या निर्णयाची आम्हाला कल्पनाही नव्हती.

सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारपासून कसोटी सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यात धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमुळे भारतीय संघाचे नेतृत्व करताना कोहली दिसणार आहे. 

कोहलीला या मालिकेत ऍडिलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. आता त्याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. 

कोहली म्हणाला, 'संघासाठी धोनीचा निर्णय अनपेक्षित होता. मेलबर्नमधील सामना संपल्यानंतर आम्ही सर्वजण पॅकींग करत असताना आम्हाला त्याच्या या निर्णयाबाबतची माहिती मिळाली. त्यावेळी आम्हा सर्वांना काय प्रतिक्रिया द्यायची हे सुचत नव्हते. 

सर्वांनाच धक्का बसला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या माझ्यासह संघातील सर्व युवा खेळाडूंसाठी हा भावनिक क्षण होता. सामन्यात विविध परिस्थितीत कसे निर्णय घेतले पाहिजेत, हे धोनीकडून शिकण्यासारखे आहे. त्याच्याकडून सल्ले घेणे मला आवडेल.'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.