CAPTURED:ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर विराट-अनुष्काचा रोमांस

 भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर हातात घालून फिरतायेत. त्यांच्या रोमांसचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. 

Updated: Jan 8, 2015, 11:08 AM IST
CAPTURED:ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर विराट-अनुष्काचा रोमांस title=

मुंबई:  भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर हातात घालून फिरतायेत. त्यांच्या रोमांसचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. 

काही दिवसांपूर्वी विराटनं एक प्रेस कॉन्फरन्स दरम्यान आपल्ं आणि अनुष्काचं नातं कबूल केलं होतं. त्यानंतर हे लव्हबर्ड अनेक ठिकाणी सोबत दिसले. 

'पीके' चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सध्या अनुष्का विराट सोबत ऑस्ट्रेलियात फिरतेय. नुकतंच या जोडीला भारतीय क्रिकेट टीमपासून अगदी दूर एका क्रूजवर स्पॉट केलं गेलं.

विराटच्या फॅन्सनी ट्विटरवर हे फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत हे कपल सिडनीतील रस्त्यावर हातात हात घालून फिरतांना दिसताय. तर दुसऱ्या फोटोत कोहली आपल्या लेडी लव्ह अनुष्कासोबत डिनर होस्ट करतांना दिसत आहे. फोटोत अनुष्का खूप खूश दिसतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.