फॉकनरवर भडकला विराट, म्हणाला गप्प बस...

मेलबर्न : मेलबर्न येथील तिसरी वन डे हरल्यावर भारताने मालिकाही गमावली.

Updated: Jan 18, 2016, 02:54 PM IST
फॉकनरवर भडकला विराट, म्हणाला गप्प बस...  title=

मेलबर्न : मेलबर्न येथील तिसरी वन डे हरल्यावर भारताने मालिकाही गमावली. पण तरीही यात असे अनेक क्षण होते जे खूप अविस्मरणीय ठरले. उपस्थित लोकांना ते पुन्हा पुन्हा आठवत राहतील.

आपल्या आक्रमक बाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीनेही या सामन्यात आपलं हेच रूप दाखवलं.

आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतलं २४वं शतक झळकावणाऱ्या कोहलीने ऑस्ट्रेलीयन गोलंदाजाची खूप धुलाई केली. त्यामुळेच कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

जेम्स विराटला खूप बरं वाईट बोलला जे स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. गप्प राहणारा विराट कुठला. तो जेम्सला म्हणाला "तू फालतू बडबड करण्यात वेळ घालवू नकोस. मी आजवर खूप जणांची धुलाई केलीये. इथून जा आणि बॉलिंग कर, समजलं?"