भारताने सामन्यासह मालिकाही गमावली

मेलबर्न वन-डेत टीम इंडियाला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवासह भारतीय टीमला पाच वन-डे मॅचेसची सीरिजही गमावावी लागली. अटीतटीच्या लढतीत कांगारुंनी भारतीय टीमवर 3 विकेट्सनी मात केली.

Updated: Jan 17, 2016, 07:15 PM IST
भारताने सामन्यासह मालिकाही गमावली title=

मुंबई : मेलबर्न वन-डेत टीम इंडियाला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवासह भारतीय टीमला पाच वन-डे मॅचेसची सीरिजही गमावावी लागली. अटीतटीच्या लढतीत कांगारुंनी भारतीय टीमवर 3 विकेट्सनी मात केली.

ग्लेन मॅक्सवेलनं 96 रन्सची इनिंग खेळत आपल्या टीमला विजय साकारुन दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 3-0 नं विजयी आघाडी घेतली. भारतानं ठेवलेलं 296 रन्सचं टार्गेट कांगारुंनी 48.5 ओव्हर्समध्येच पार केलं.

भारतीय बॉलर्सना पुन्हा एकदा लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताकडून विराट कोहलीनं 117 रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं या मॅचमध्ये वन-डेत फास्टेस्ट सात हजार रन्स पूर्ण कऱण्याचा पराक्रमही केला. मात्र, त्याची ही इनिंग व्यर्थ ठरली. आता उर्वरित दोन वन-डेत टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.