क्रिकेटच्या इतिहासातील १० लज्जास्पद घटना

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून मैदानात बाटल्या फेकल्या. ही घटना काही नवीन नाही. यापूर्वीही अशा १० घटना घटल्या आहेत. त्याने क्रिकेटचे नाक कापले गेले होते. 

Updated: Oct 7, 2015, 07:42 PM IST
क्रिकेटच्या इतिहासातील १० लज्जास्पद घटना  title=

मुंबई :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून मैदानात बाटल्या फेकल्या. ही घटना काही नवीन नाही. यापूर्वीही अशा १० घटना घटल्या आहेत. त्याने क्रिकेटचे नाक कापले गेले होते. 


कटक मधील प्रेक्षकांची हुल्लडबाजी

१) १६ ते २० फेब्रवारी १९९९ - भारत वि. पाकिस्तान, एशिया टेस्ट चॅम्पियनशीप - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. १९९९ मध्ये पाकिस्तानच्या भारत दौऱ्यातील कोलकता टेस्टची ही घटना आहे. शोएबने सचिन आणि द्रविड यांना आऊट केल्यावर या मॅचमध्ये प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली. प्रेक्षकांना मोठ्या मुश्किलीने काबू करण्यात आले. ईडन गार्डनमध्ये प्रेक्षकांनी दगड फेकली होती आणि पोस्टर जाळले होते. या सामन्यानंतर आफ्रिदीने कमेंट केली होती, की सचिन तेंडुलकरचा शोएबसमोर थरकाप होताना मी पाहिला होता. 

२) १ जानेवारी १९६७, भारत वि. वेस्ट इंडिज - या सामन्यात प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी केली होती. पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागला होता. 

३) १३ मार्च १९९६, भारत वि. श्रीलंका, वर्ल्ड कप, सेमी फायनल - विनोद कांबळीचे ते फोटो किंवा व्हिडिओ कोणी विसरू शकत नाही. जेव्हा तो मैदानात ढसाढसा रडला होता. कांबळीने आरोप लावला होता ती मॅच फिक्स होती. या सामन्यातही भारतीय संघाच्या विकेट पडत असल्याने प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली होती. काही श्रीलंकन खेळाडूंना दगडही मारले होते. 

४) ९ नोव्हेबर १९६९, भारत वि. ऑस्ट्रेलिया, ब्रेबॉर्न स्टेडिअम - १९६९ ची ही टेस्ट वादात अडकण्यापासून वाचली, प्रेक्षकांनी स्टँडमध्ये आग लावली होती. तसेच बाटल्याही मैदानात फेकल्या होत्या. 

५) ६ नोव्हेंबर २००२, भारत वि. वेस्ट इंडिज, किनन स्टेडिअम - जमशेदपूरमध्ये फॅन्सने सामन्यात अडथळा निर्माण केला होता आणि मैदाना बाटल्या फेकल्या होत्या. 

६) ४ जून १८७९, इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी, अंपायरच्या निर्णयावर नाराज होऊन २००० फॅन्स पिचवर येऊन गोंधळ घातला होता. 

७) १३ फेब्रुवारी १९७१, इंग्लड वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी - या सामन्यात प्रेक्षकांनी बिअरच्या बाटल्या फेकल्या होत्या. 

८) १३ फेब्रुवारी १९७१, भारत वि. पाकिस्तान, टोरंटो  - भारत-पाक दरम्यान झालेल्या सामन्यात इंझमान उल हक आणि प्रेक्षकांमध्ये वाद झाला होता. प्रेक्षकांनी त्याला वजनावरून चिडवले होते. यावरून खूप वाद निर्माण झाला होता. 

९) ३१ जानेवारी २०१०, पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, पर्थ - या सामन्यात ऑस्ट्रेलियन फॅन्स नशा करून मैदानात आला होता आणि वाद निर्माण झाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.