पुणे : पुण्यातील २४ वर्षीय क्रिकेटर विराग मोरेने अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड बनवून नवा इतिहास रचलाय. विराग आता क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळ नेट प्रॅक्टिस करणारा एकमेव फलंदाज ठरलाय. विरागने मंगळवार ते गुरुवारपर्यंत नेटवर ५० तास बॅटिंग करताना इंग्लंडच्या डेव न्यूमॅन आणि रिचर्ड वेल्स यांचा रेकॉर्ड मोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपल्या नावाची नोंद केलीय.
विरागने ५० तासांच्या या नेट सेशनमध्ये तब्बल २४४७ ओव्हर(१४ हजार ६८२ चेंडू) तो खेळला. विरागने ५० तासांच्या या रेकॉर्डमदरम्यान दर दोन तासांनी १०-१० मिनिटांचा ब्रेक घेतला होता. २७ तास बॅटिंग प्रॅक्टिस केल्यानंतर विराग थकला होता. मात्र नेट प्रॅक्टिस पाहणाऱ्या वडिलांना पाहून त्याला नवी उर्जा मिळाली आणि तो नेटाने फलंदाजी करु लागला.
विरागला सचिनसारखा फलंदाज बनायचे आहे. त्यासाठी सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या क्रिकेट अकादमीत त्याने काही काळ प्रशिक्षणही घेतले. मात्र पैसे नसल्या कारणाने त्याला ती अॅकॅडमी सोडावी लागली