'शक्तिमान'ला जखमी करणाऱ्यावर विराट संतापला, म्हणाला मुक्या जनावरावर हा भ्याड हल्ला

उत्तराखंडमधील डेराढूनमध्ये 'शक्तिमान' नावाच्या घोड्यावर भाजप कार्यकर्त्याने पायावर हल्ला करत त्याला जखमी केले. या घडनेबाबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला. त्याने ट्विट करुन आपला संताप प्रकट केलाय.

PTI | Updated: Mar 18, 2016, 03:33 PM IST
'शक्तिमान'ला जखमी करणाऱ्यावर विराट संतापला, म्हणाला मुक्या जनावरावर हा भ्याड हल्ला title=

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील डेराढूनमध्ये 'शक्तिमान' नावाच्या घोड्यावर भाजप कार्यकर्त्याने पायावर हल्ला करत त्याला जखमी केले. या घडनेबाबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला. त्याने ट्विट करुन आपला संताप प्रकट केलाय.

'शक्तिमान'ला जखमी करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. मुक्या जनावरावर हा भ्याड हल्ला असल्याची प्रतिक्रिया विराटने दिली आहे. मी या घटनेचा निषेध करीत आहे. मी आशा करतो की ज्याने हा हल्ला केला आहे, त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे. तसेच शक्तिमान लवकरात बरा होवो, अशी प्रार्थना करतो.

भाजपच्या विरोध प्रदर्शन आंदोलनाच्यावेळी सोमवारी उत्तराखंड पोलिसांचा शक्तिमात या घोड्यावर लाठीमार करण्यात आला. त्याला जखमी करण्यात आले. हा हल्ला भाजपचे मसूरीचे आमदार गणेश जोशी यांनी केला. याप्रकरणी त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यांच्यावर घोड्यावर हल्ला केल्याचा आणि त्याचा पाय मोडल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे भाजपने केलेली अटक चुकीची असून त्यांना सोडण्यात यावी, अशी मागणी केली आहे.