उसेन बोल्ट पुन्हा ठरला वेगाचा बादशाह

जमैकाच्या उसेन बोल्ट आज पुन्हा एकदा सर्वात जगातला वेगवान पुरूष ठरलाय. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अथॅलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उसेन बोल्टनं निर्धारीत अंतर अवघ्या ९.७९ सेकंदात पार केलं.

Updated: Aug 23, 2015, 08:04 PM IST
उसेन बोल्ट पुन्हा ठरला वेगाचा बादशाह title=

बीजिंग: जमैकाच्या उसेन बोल्ट आज पुन्हा एकदा सर्वात जगातला वेगवान पुरूष ठरलाय. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अथॅलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उसेन बोल्टनं निर्धारीत अंतर अवघ्या ९.७९ सेकंदात पार केलं.

त्याच्या पाठोपाठ जस्टीन गॅटलिनं दुसरा क्रमांक पटकावला. २०१३मध्ये उसेन बोल्टनंच वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. पण त्यानंतर बोल्ट दुखापतग्रस्त होता. दुखापतीनंतरच्या पहिल्याच मोठ्या स्पर्धेत उतरताना सुरूवातीपासून बोल्टला सूर गवसला नाही.

सेमीफायनलच्या रेसमध्ये तर तो चक्क नवव्या स्थानावर होता. त्यामुळे त्याच्या फायनलमध्ये त्याच्या विजयाबद्दल साशंकता होती. पण त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षांवर अगदी तंतोतंत खरा उतरणारा उसेन यंदाही विजेता ठरला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.