नवी दिल्ली : भारताविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तीन टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान खेळणार नाहीये. विकेटकीपर निरोशन डिकवेलाल दिलशानच्या जागी संधी देण्यात आलीये.
हाताला दुखापत झाल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. मात्र १२ फेब्रुवारीला रांचीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे दिलशान बाहेर गेल्यानंतर विकेटकीपर निरोशनला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संधी दिलीय.
श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पुण्यात होणार आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारीला रांचीमध्ये आणि १४ फेब्रुवारीला अखेरचा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या तयारीच्या दृष्टीने या मालिकेकडे पाहिले जातेय.