2016 मध्ये भारतच अव्वल!

2016 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सर्वोत्तम ठरलं आहे. यंदाच्या वर्षी भारतानं तब्बल 41 मॅच खेळल्या आहेत.

Updated: Dec 22, 2016, 08:52 PM IST
2016 मध्ये भारतच अव्वल! title=

मुंबई : 2016 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सर्वोत्तम ठरलं आहे. यंदाच्या वर्षी भारतानं तब्बल 41 मॅच खेळल्या आहेत. यापैकी 31 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर 11 मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आणि 3 मॅच ड्रॉ तसंच एका मॅचचा कोणताही निर्णय लागला नाही.

2016च्या कामगिरीच्या यादीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतापाठोपाठ या यादीत दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागतो. आफ्रिकेनं 2016मध्ये 34 मॅच खेळल्या यातल्या 20 मॅचमध्ये विजय, 11 मॅचमध्ये पराभव, 2 मॅच ड्रॉ आणि एका मॅचचा निकाल लागला नाही.

यंदाच्या वर्षात श्रीलंकेची कामगिरी मात्र निराशाजनक झाली. 2016च्या या यादीमध्ये श्रीलंका शेवटच्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेनं यंदा खेळलेल्या 43 मॅचपैकी 14 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 24 मॅचमध्ये श्रीलंकेला पराभवाला सामोरं जावं लागलं. श्रीलंकेची प्रत्येकी एक मॅच ड्रॉ आणि टाय झाली आणि तीन मॅचचा निकाल लागला नाही.

पाहा कशी आहे 2016मधली सगळ्या टीमची कामगिरी