कोहली-रहाणेमुळे इंदूर टेस्टमध्ये भारताचा धावांचा डोंगर

विराट कोहलीच्या कोहलीच्या डबल सेंच्युरी आणि अजिंक्य रहाणेच्या 188 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर टेस्टमध्ये आपली पहिली इनिंग 557 रन्सवर 5 विकेट्सवर घोषीत केली.

Updated: Oct 9, 2016, 06:04 PM IST
कोहली-रहाणेमुळे इंदूर टेस्टमध्ये भारताचा धावांचा डोंगर title=

इंदूर : विराट कोहलीच्या कोहलीच्या डबल सेंच्युरी आणि अजिंक्य रहाणेच्या 188 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर टेस्टमध्ये आपली पहिली इनिंग 557 रन्सवर 5 विकेट्सवर घोषीत केली.

कॅप्टन विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधील दुसरी डबल सेंच्युरी झळकावली. दोन डबल सेंच्युरी झळकावणारा कोहली पहिला भारतीय टेस्ट कॅप्टन ठरला, तर अजिंक्य रहाणेनं आठवी टेस्ट सेंच्युरी ठोकली.

या दोघांनी चौथ्या विकेट्ससाठी 365 रन्सची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप केली. या दोघांच्या पार्टनरशिपच्या जोरावरच भारताला 550 रन्सचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तराखल किवी टीमनं बिनबाद 28 रन्स अशी आश्वासक सुरुवात केली आहे. आता टेस्टच्या तिस-या दिवशी टीम इंडिया किवी टीमला फॉलोऑन देण्यासाठी प्रयत्नशील असेल.