सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट

धोनीची कसोटीमधून निवृत्ती आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-० ने गमाविल्यानंतर टीम इंडियाला याचं दुःख असेल असे तुम्हांला वाटत असेल पण असे काही नाही. आपले मस्त मगन मस्त मगन होऊन सिडनीतील एका क्लबमध्ये पार्टी ऑल नाइट म्हणत सुंदर बालांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत. 

Updated: Jan 9, 2015, 07:59 PM IST
सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट  title=

सिडनी : धोनीची कसोटीमधून निवृत्ती आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-० ने गमाविल्यानंतर टीम इंडियाला याचं दुःख असेल असे तुम्हांला वाटत असेल पण असे काही नाही. आपले मस्त मगन मस्त मगन होऊन सिडनीतील एका क्लबमध्ये पार्टी ऑल नाइट म्हणत सुंदर बालांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत. 

सध्या सोशल साईट्सवर भारतीय खेळाडूंचे मजा-मस्ती करणारे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.  यात सुरेश रैना, ईशांत शर्मा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीसह अनेक खेळाडू सिडनीतील नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. 

  
यावेळी खेळाडूंच्या एका हातात बाटली आणि दुसरीकडे सुंदर बाला दिसत आहेत. यातील एका फोटोमध्ये एकीकडे अश्विनच्या आजूबाजूला दोन मुली आहेत तर ईशांत शर्माला भुवनेश्वर बाटलीमधून कोणते पेय पाजत आहे ते समजत नाही कारण ती बाटली काळी आहे. 

या मस्ती मूडमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत उपस्थित होता, मात्र तो त्याआधीच तिथून निघाला होता.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.