नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतची एक चूक त्याला चांगलीच महागात पडली.
ऋषभ फलंदाजी करत असताना त्याच्याविरुद्ध एलबीडब्लूचे अपील विरुद्ध संघाकडून करण्यात आले. यावेळी त्याचे लक्ष पंचाकडे होते. याचाच फायदा रैनाने उचलला आणि त्याला धावबाद केले.
ही घटना सामन्यातील १.५ षटकांत घडली. प्रदीप सांगवानच्या बॉलवर ऋषभ चुकला आणि बॉल त्याच्या पायाला लागून स्लिपमध्ये फिल्डिंग करत असलेल्या रैनाकडे गेला. यावेळी बॉलरने एलबीडब्लूचे अपील केले. मात्र अंपायरनी नाबाद घोषित केले. यावेळी ऋषभचे संपूर्ण लक्ष अंपायरकडे होते. रैनाने याचाच फायदा घेत शानदार थ्रो करत स्टंप उडवला. रैनाच्या थ्रोनंतर ऋषभ पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला. कारण त्याला माहीत होते की जेव्हा बॉल थ्रो झाला तेव्हा त्याची बॅट क्रीजवर नव्हती.
https://t.co/0MuzgS3pWA #VIVOIPL via @ipl
— Cricket-atti (@cricketatti) May 10, 2017