'कोल्हापूरची सुल्तान'... भारताची शान!

कोल्हापूरला कुस्तीचं माहेरघर मानलं जातं. अनेक राज्यातले खेळाडू खास कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरात येतात.

Updated: Nov 5, 2016, 10:58 PM IST
'कोल्हापूरची सुल्तान'... भारताची शान!   title=

प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापूरला कुस्तीचं माहेरघर मानलं जातं. अनेक राज्यातले खेळाडू खास कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरात येतात.

याच कोल्हापूरात आनेक मुली कुस्तीचा सराव करुन आपलं आणि पर्यायान कोल्हापूरचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैंकीच एक आसनारी रेश्मा माने. रेश्मा माने या कोल्हापूरच्या कन्येनं राष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केलीय. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रेश्मान सुवर्णपदक जिंकून भारताचं खातं खोललं.

रेश्मा अनिल माने... 'कोल्हापूरची सुल्तान' म्हटलं तर वावगं ठरणार नाही... सिंगापूरमध्ये आजपासून राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आणि स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रेश्मानं सुवर्णपदकाची कमाई केली. ६३ किलो वजनी गटामध्ये रेश्मानं सिंगापूरच्याच चर्मायनी हुगीटिव्हाना आणि भारताच्याच गार्गी यादवला आस्मान दाखवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 

रेश्मा माने गेल्या १४ वर्षापासून कुस्तीच्या आखाड्य़ात मेहनत करतेय. वयाच्या चौथ्या वर्षीच कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांनी रेश्मामधील गुण हेरलं आणि कुटुंबियांच्या मदतीनं रेश्मानं आज उत्तुंग भरारी घेतली. आज रेश्माचे प्रशिक्षक राम सारंग यांनाही, रेश्माचे वडील अनिल माने यांनाही रेश्माचा अभिमान वाटतोय. 

आखाड्यात इतकी मेहनत घ्य़ायची म्हटल्यानंतर रेश्माचा खुराकही तसाच असायचा. राष्ट्रकूल स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या रेश्माचं पुढील लक्ष्य आहे ऑलिम्पिक स्पर्धा... ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तिचे कुटुंब आणि तिचे प्रशिक्षक राम सांरग खूप मेहनत घेत आहेत. रेश्मानं अशीच कामगिरी करुन ऑलिम्पिकमध्येही भारताला सुवर्णपदक मिळवून द्यावं, आशी सर्वाचीच आपेक्षा...