शरीरसंपत्तीने भरभरून दिलं, पण कर्माने नेलं

बॉडीबिल्डर सुहास खामकरने शरीरयष्ठीमुळे मिळवलेली ओळख अखेर धुळीस मिळवली आहे. 

Updated: Aug 4, 2014, 07:14 PM IST
शरीरसंपत्तीने भरभरून दिलं, पण कर्माने नेलं title=

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातिचा शरीरसौष्ठवपटू सुहास खामकरने शरीरयष्ठीमुळे मिळवलेली ओळख अखेर धुळीस मिळवली आहे. 

सुहास खामकरला शरीरसंपत्ती लाभलेली असतांना, त्याला लाच घेण्याचा मोह आवरता आला नाही. सुहास खामकरवर 50 हजाराची लाच घेतल्याचा आरोप आहे. 

बॉडीबिल्डिंग जोरावर सुहासला नायब तहसिलदाराची नोकरी मिळाली होती, मात्र रायगड अँटिकरप्शनने सुहासला लाच घेतांना अटक केली आहे.

सातबाराच्या उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी सुहास खामकरने लाच मागितल्याची तक्रार होती, यावरून सापळा रचण्यात आला, आणि सुहास खामकरचे साथीदार रंगेहात सापडले.

सुहास खामकरला महाराष्ट्र सरकारकडून त्याला शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला होता, तो आता परत घेतला जाईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सुहास खामकरला याआधी रेल्वेत तिकीट तपासनीसची नोकरी मिळाली होती, मात्र महाराष्ट्र सरकारने ही खेळाची कर्तबगारी पाहून त्याला नायब तहसिलदाराची नोकरी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.