पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय झालाय. ऑस्ट्रेलियातच ऑस्ट्रेलियन टीमचं गर्वहरण करण्यात दक्षिण आफ्रिकन टीमला यश आलंय. 

Updated: Nov 7, 2016, 02:31 PM IST
पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय title=

पर्थ : पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय झालाय. ऑस्ट्रेलियातच ऑस्ट्रेलियन टीमचं गर्वहरण करण्यात दक्षिण आफ्रिकन टीमला यश आलंय. 

पहिल्याच टेस्टमध्ये 177 रन्सनी ऑस्ट्रेलियाचा पराभव झालाय. दक्षिण आफ्रिकेकडून दुस-या इनिंगमध्ये 141 रन्सची इनिंग करणारा जेपी ड्युमिनी आणि 127 रन्सची खेळी करणारा डीन एल्गार या विजयाचे शिल्पकार ठरलेत..
 
या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं कांगारुंपुढे 539 रन्सचे टार्गेट ठेवलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना स्मिथ सेना सपशेल अपयशी ठरलीय. 

चार वर्षांनंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कांगारुंना पराभवाचा सामना करावा लागलाय तर 28 वर्षांनंतर मोसमात सिरीजमधील पहिलीच टेस्ट ऑस्ट्रेलियन टीमला गमवावी लागलीय. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकन टीमनं सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीय.