सिक्सरचा रेकॉर्ड तोडण्यास केवळ ७६ षटकार कमी

 वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३७३ षटकार लगावण्यात आले असून हे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी यंदा केवळ ७६ षटकार कमी आहे.

Updated: Mar 9, 2015, 09:30 PM IST
सिक्सरचा रेकॉर्ड तोडण्यास केवळ ७६ षटकार कमी  title=

अॅडलेड :  वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३७३ षटकार लगावण्यात आले असून हे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी यंदा केवळ ७६ षटकार कमी आहे.

यंदा वर्ल्ड कपच्या ३३ सामन्यात एकूण २९७ षटकार लगावण्यात आले. त्यात सर्वाधिक क्रिस गेलने झिम्बाम्वे विरूद्धच्या सामन्यात १६ षटकार लगावले होते.  अजून या वर्ल्ड कप अजून १६ सामने शिल्लक असून त्यात मॅक्युलम, गेल यांची फटकेबाजी अजून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो.  

या यादीत १९७५ आणि १९७९ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी २८ षटकार लगावण्यात आले होते. त्यानंतर क्रिकेटचा वेग वाढला आणि षटकारांची संख्या वाढली. १९७९ ते २००७ पर्यंत सिक्सरमध्ये वाढ होत गेली. पण २०११मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ही संख्या घटली होती. ती २५८ पर्यंत खाली आली होती. 

आतापर्यंत एका वर्ल्ड कपमध्ये लगावलेले षटकार 

2007: 373,
2015: 297*
2003: 266
2011: 258
1999: 153
1996: 148
1987: 126
1992: 93
1983: 77
1975/1979: 28
#CWC15

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.