शोएब-सानियाचा 'अभी तो पार्टी...' डबस्मॅश व्हिडिओ वायरल

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा शोएब मलिकनं आपला डबस्मॅश व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. सानिया मिर्झानं यापूर्वीही अनेक डबस्मॅश व्हिडिओ शेअर केलेत. मात्र पहिल्यांदा दोघांनी एकत्र व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय.

Updated: Jul 21, 2015, 02:17 PM IST
शोएब-सानियाचा 'अभी तो पार्टी...' डबस्मॅश व्हिडिओ वायरल title=

मुंबई: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा शोएब मलिकनं आपला डबस्मॅश व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. सानिया मिर्झानं यापूर्वीही अनेक डबस्मॅश व्हिडिओ शेअर केलेत. मात्र पहिल्यांदा दोघांनी एकत्र व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानियानं 'अभी तो पार्टी शुरू हुई है...' या गाण्यावर डबस्मॅश व्हिडिओ बनवलाय. श्रीलंकेविरोधात रविवारी पाकिस्ताननं तिसरी वनडे मॅच जिंकली. ही मॅच पाहायला सानिया श्रीलंकेत होती. मॅचनंतर आपल्या नवऱ्यासोबत तिनं हा विजय साजरा केला. 

नुकताच सानियानं मार्टिना हिंगिससोबत विम्बल्डन डबल्सचा खिताब पटकावलाय. अशात सानिया-शोएब दोघंही पार्टी एंजॉय करतायेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.