भारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Mar 20, 2016, 09:28 AM IST
भारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का title=

मुंबई: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. बांग्लादेशचा फास्ट बॉलर तस्किन अहमद आणि स्पिनर अराफत सनी यांच्यावर आयसीसीनं बंदी घातली आहे. 

या दोघांच्या बॉलिंग ऍक्शनमुळे आयसीसीनं ही कारवाई केली आहे. बांग्लादेशचा सुरवातीच्याच मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभव झाला, त्यानंतर आता त्यांच्या दोन बॉलर्सवर कारवाई करण्यात आली आहे. टस्किन अहमद हा बांग्लादेशच्या बॉलिंगचा हुकमी एक्का आहे, त्यामुळे या स्पर्धेत त्यांना आव्हान टिकवणं आणखी कठीण झालं आहे. 

बांग्लादेशची पुढची मॅच ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 तारखेला होणार आहे, तर भारताविरुद्ध ते 21 मार्चला खेळतील. त्यामुळे या दोन्ही टीमची डोकेदुखी थोडीफार कमी झाली असेल.