"भारतीय मुस्लिम पहिल्यांदा भारतीय आहे, मग मुस्लिम"

अमरोहा जिल्ह्यातील सहसपूरमधील अलीनगर गावात, तीन खोल्यांमध्ये बसलेले मोहम्मद शमीचे वडिला मोहंम्मद तौसिफ, सामन्यातला तो क्षण अजूनही विसरत नाहीत.

Updated: Feb 17, 2015, 10:35 PM IST
"भारतीय मुस्लिम पहिल्यांदा भारतीय आहे, मग मुस्लिम" title=

अमरोहा : अमरोहा जिल्ह्यातील सहसपूरमधील अलीनगर गावात, तीन खोल्यांमध्ये बसलेले मोहम्मद शमीचे वडिला मोहंम्मद तौसिफ, सामन्यातला तो क्षण अजूनही विसरत नाहीत.

कारण त्यांचा मुलगा शमीनं अॅडलेट सामन्यात रविवारी पाकिस्तानच्या चार बॅटसमनना एक नंतर एक माघारी पाठवलं. ही बाब भारताला विजयासाठी महत्वपूर्ण ठरली.

रविवारी शमीचं परिवार एका लग्न सोहळ्यात भाग घेण्यासाठी संभलमध्ये होतं, मात्र सर्व जण सामना पाहण्यासाठी टीव्ही जवळ बसून होते. या सामन्यात २४ वर्षीय शमीने ३५ रन्स देऊन २४ विकेट घेतल्या.

शमीचे वडिल यावर म्हणाले, भारतीय असणं किती कल्पनेच्याही बाहेर असतं, माझा मुलगा एखाद्या बहादुर सैनिकाप्रमाणे लढत होता. आज मी गर्वाने सांगू शकतो, शमीच्या खेळाने ते सिद्ध केलं आहे, भारतीय मुस्लिम पहिल्यांदा भारतीय आहे, मग मुस्लिम. भारतीय मुस्लिमांमध्ये देशभक्तीचा तोच भाव असतो.

तौसिफच्या वडिलांनी सांगितलं, मी क्रिकेटचा मोठा फॅन आहे, मी शेतकरी आहे, पण मी माझ्या मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, लहानपणी त्याने एक बॉलर म्हणून चांगला खेळ केला, मी फक्त त्याच्या कर्तुत्वाला, आवडीला प्रोत्साहन दिलं.

मला माझ्या मुलाला एकदा पाकिस्तान विरोधात खेळतांना पाहायचं होतं, ते स्वप्न माझं साकारलं आहे.

शमीची आई म्हणते, मला क्रिकेट पाहण्यात जास्त रस नव्हता, पण जेव्हापासून माझा मुलगा खेळतोय मी एक क्षणही टीव्हीपासून दूर राहत नाही. मला शमीला खेळतांना पाहायला आवडतं. भारत-पाकिस्तान सामन्याची आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.