'पाक' विजयाची आठवण असलेला स्टम्प का नेऊ शकला नाही धोनी?

 पाकिस्तान विरुद्ध प्रत्येक विजयाची आठवण म्हणून सवयीप्रमाणे कॅप्टन महेंद्र सिंह धोनी स्टम्प नेवू शकला नाही. हा पहिलाच असा वर्ल्डकप ठरला. 

Updated: Feb 17, 2015, 12:24 PM IST
'पाक' विजयाची आठवण असलेला स्टम्प का नेऊ शकला नाही धोनी? title=

मेलबर्न:  पाकिस्तान विरुद्ध प्रत्येक विजयाची आठवण म्हणून सवयीप्रमाणे कॅप्टन महेंद्र सिंह धोनी स्टम्प नेवू शकला नाही. हा पहिलाच असा वर्ल्डकप ठरला. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एलइडी स्टम्प्सचा वापर केला गेलाय. स्टम्पला हात लावताच त्याची गिल्ली चमकते. अॅडलेडच्या ओव्हल मैदानात पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर सवयीप्रमाणे धोनीनं गिल्ली उचलली. पण स्क्वेअर लेग अंपायर इयान गुल्डसोबत त्याचं काही बोलणं झालं आणि त्यानंतर धोनीनं गिल्ली पुन्हा जागेवर ठेवली. 

एलइडी स्टम्पचा एक सेट जवळपास २४ लाख रुपयांचा आहे आणि एका गिल्लीची किंमत ५० हजार रुपयांच्या जवळपास आहे. धोनी आयसीसीकडून अधिकृतरित्या परवानगी घेतल्याशिवाय ही महागडी गिल्ली सोबत नेऊ शकला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.