युवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.

Updated: Mar 20, 2016, 12:13 AM IST
युवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण... title=

कोलकाता : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.

युवराज सिंगने आफ्रिदीच्या बॉलवर एक सुंदर स्विप शॉट मारला त्यानंतर आफ्रिदी युवराजकडे गेला आणि त्याला काही तरी बोलला त्यानंतर युवराजने ही त्याला उत्तर दिलं पण त्यावर आफ्रिदी हसला आणि पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी निघून गेला.

भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे जगातील एक महत्त्वाची घटनाच असते त्यामुळे अशा मॅचमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची ठरते. पण भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव करत विजयाचा आपला सिलसिला सुरु ठेवला.

पाहा व्हिडिओ