भारत-पाकिस्तान मॅचला किंग खानची दांडी

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती

Updated: Mar 20, 2016, 09:58 PM IST
भारत-पाकिस्तान मॅचला किंग खानची दांडी title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती. कोलकात्याला मॅच होणार त्यामुळे मॅच पाहण्यासाठी अनेकांना हजेरी लावली. त्यामध्ये प्रेक्षकांसह अनेक बॉलिवूड कलाकारांचा देखील मोठा सहभाग होता.

कोलकात्यात ही मोठी मॅच पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, निता अंबानी, मुकेश अंबानी, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन हे मोठे चेहरे उपस्थित होते पण यामध्ये एक चेहरा नव्हता तो म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान.

शाहरुख खान उपस्थित नसल्याने अनेकांनी चर्चा सुरु केल्या पण शाहरुख खान हा भारतात नसल्याने मॅच पाहायला येऊ शकला नाही. शाहरुख सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्थ आहे. पण त्याने मॅचची हायलाईट्स पाहून आनंद साजरा केला आणि भारत फायनल जिंकू दे अशा ही शुभेच्छा दिल्या.

 

Missed the match & the madness of Eden. Saw highlights now, post a lot of work in Dubai. Chalo InshaAllah will watch India win the finals on ground. #WT20

Posted by Shah Rukh Khan on Saturday, March 19, 2016