पुणे : आयपीएलच्या दहाव्या मोसमातील पहिली सेंच्युरी झळकवण्याचा मान दिल्लीच्या संजू सॅमसनला मिळाला आहे. पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये संजूनं ६३ बॉलमध्ये १०२ रन्सची खेळी केली. संजूच्या या खेळीमध्ये ८ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता.
संजू सॅमसनचं शतक आणि क्रिस मॉरिसच्या ९ बॉलमध्ये केलेल्या ३८ रन्समुळे दिल्लीनं पुण्यापुढे २०६ रन्सचं तगडं आव्हान ठेवलं. या मॅचमध्ये पुण्याचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ पोटाच्या दुखापतीमुळे खेळत नाहीये. स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेकडे पुण्याचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
VIDEO: You beauty! Sanju Samson's whirlwind century https://t.co/Sih9csPKbz - @DelhiDaredevils #IPL #RPSvDD
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2017