मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. क्रिकेट जगतातील शिखरावर तो आहे.
मात्र हे इतके मोठे यश त्याला काही सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. आपला फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी, शरीराची तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी त्याने अपार मेहनत घेतलीये. त्या मेहनतीचेच फळ म्हणून तो क्रिकेटमध्ये अत्युच्च शिखरावर आहे.
आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली. 24 वर्षांच्या या क्रिकेट प्रवासात बिटवीन दी विकेट रन्स घेताना सचिन तब्बल 353 किमी धावलाय. म्हणजेच हे अंतर दिल्ली ते शिमलादरम्यानच्या अंतरापेक्षा थोडे अधिक आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने केवळ धावून 7,275 रन्स, वनडेत 9,192 आणि टी-20मध्ये धावून 1,087 रन्स केलेत. 463 वनडेमध्ये त्याने 18 हजार 426 धावा केल्या तर 200 कसोटीत 15921 रन्स केलेत.