‘स्वच्छ भारत’साठी क्रिकेटच्या देवानं हाती घेतला झाडू!

 स्वच्छता अभियानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर स्वतः सक्रीय झालाय. आज पहाटे 4:30 वाजता त्यानं आपल्या मित्रांसह हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. 

Updated: Oct 6, 2014, 08:24 AM IST
‘स्वच्छ भारत’साठी क्रिकेटच्या देवानं हाती घेतला झाडू! title=

मुंबई :  स्वच्छता अभियानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर स्वतः सक्रीय झालाय. आज पहाटे 4:30 वाजता त्यानं आपल्या मित्रांसह हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सहभागी झाला आहे. पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबरला सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रिटीजना स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.

त्यानंतर सचिननं पंतप्रधानांचं हे आवाहन स्वीकारलं आणि आपल्या मित्रांसह या अभियानात सहभागी झाला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.