नवी दिल्ली : क्रिकेट जगताचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अभिनेता आमिर खानच्या टेलिव्हिजन कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’चे कौतुक केले आहे.
ज्या दिवशी खेळाचा समावेश हा प्रत्येक भारतीयांच्या आयुष्याचा एक भाग होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारताच्या भविष्यात सुधारणा होऊ शकते, असं सचिनने म्हटलंय. सचिनने हा संदेश सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकद्वारे दिला आहे.
“मला असे वाटते की, खेळामुळे देशाचे भविष्य बदलू शकते आमिरचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद पात्र ठरला आहे. ‘स्पोर्टस4ऑल’ हे देशासाठी वरदान ठरणार आहे.” या शब्दात सचिने अभिनंदन केले आहे.
खेळाच्या संस्था या राजकारणी किंवा व्यवसायिकांच्या हातात द्यायला हव्यात. की, माजी खेळाडू किंवा खेळाचे प्रशासकांनाच्या हातात द्याव्यात. अशी आगळी-वेगळी मोहिम राबविण्याचा प्रयत्न आमिरने त्याच्या कार्यक्रमातून केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.