सिडनी : ब्रिटनच्या अँडी मरेची ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी मालिका कायम आहे.
नंबर वन सीडेड मरेला 31 व्या मानांकित अमेरिकेच्या सॅम क्युरीनं विजयासाठी थोडफार झुंजवलं. मात्र, मरेनं या मुकाबल्यात अखेर 6-4,6-2,6-4नं बाजी मारली.
तर दुसऱ्या सिडिंगमुळे विचित्र ड्रॉ पडलेला रॉजर फेडरर टॉप सिक्सटीनमध्ये दाखल झालंय. तिसऱ्या फेरीत फेडररनं झेक रिपब्लिकच्या थॉमस बर्डीचचा 6-2, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.