साक्षी मलिकच्या कुटुंबीयांचा जल्लोष, भावाला दिली रक्षाबंधन भेट

साक्षी मलिकने ब्राँझ जिंकत इतिहास रचला. साक्षीने मेडल जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी तिने आपल्या भावाला मेडल गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली. 

Updated: Aug 18, 2016, 08:20 AM IST
साक्षी मलिकच्या कुटुंबीयांचा जल्लोष, भावाला दिली रक्षाबंधन भेट title=

रिओ : साक्षी मलिकने ब्राँझ जिंकत इतिहास रचला. साक्षीने मेडल जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी तिने आपल्या भावाला मेडल गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली. 

रिओ ऑलिम्पिकमध्ये ब-याच प्रतिक्षेनंतर अखेर भारताला पहिलं कांस्य पदक मिळाले आहे. भारताची मल्ल साक्षी मलिकने भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले आहे. 58 किलो वजनी गटात साक्षीनं कझाकिस्तानची मल्ल आयसूलू टायनाबेकोव्हावर 8-5नं मात केली आहे.

बचाव आणि आक्रमण याची उत्तम सांगड घालत साक्षीनं उत्तम खेळ केला. साक्षी मलिक आणि आयसूलूची लढत चांगलीच रंगतदार ठरली. पराभूत आयसूलूनं रेफ्रेल मागितले पण रेफ्रेलचा निर्णय देखील भारताच्याच बाजूने लागल्याने साक्षीला आणखीन एक गुण मिळाला. भारताला पहिलं पदक मिळताच सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला.