टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.

Updated: Jun 6, 2016, 08:54 PM IST
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज title=

मुंबई : टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. रवी शास्त्रीनं नुकतंच 18 महिने टीम इंडियाचे निर्देशक म्हणून काम पाहिलं आहे. 

आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायला रवी शास्त्रींनी नकार दिला होता. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगरची कोच म्हणून नियुक्ती झाली होती. टीम इंडियाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले होते. यानंतर आता रवी शास्त्रीनं हा अर्ज भरला आहे. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटीलही टीम इंडियाचे कोच होण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत.