रणजीच्या उपांत्य फेरीत पृथ्वी शॉचं शतक

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईतलं क्रिकेटचा नूर अजूनही कायम असल्याचं अधोरेखित झालं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2017, 12:19 AM IST
 रणजीच्या उपांत्य फेरीत पृथ्वी शॉचं शतक title=

मुंबई : पृथ्वी शॉ...या वीकेंडला मुंबईच्या नाक्या नाक्यावर याच नावाची चर्चा आहे. कारणही तसंच आहे. 17 वर्षाच्या पृथ्वी शॉची कामगिरी आज पस्तीशीत असणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला सचिनची आठवण करून देत आहे.

पृथ्वी शॉ... वय वर्ष 17...कामगिरी एखाद्या सराईत क्रिकेटपटूला लाजवेल अशी...रणजी ट्रॉफीच्या तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्यफेरीसाठी पृथ्वी शॉची मुंबई संघात निवड झाली. आणि तेव्हाच पृथ्वीच्या नावाची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली. त्यानं उपांत्य फेरीत शतक झळकावलं आणि आपली निवड सार्थ ठरवली.  

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईतलं क्रिकेटचा नूर अजूनही कायम असल्याचं अधोरेखित झालं. 

पृथ्वी शॉनं 2013 मध्ये शालेय क्रिकेटमध्ये 546 रन्सची विक्रमी कामगिरी केली होती. मात्र आता त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपला दर्जा सिद्ध केलाय. आता त्याच्यासमोर आपला हाच फॉर्म कायम ठेवायचं आणि टीम इंडियात स्थान पटकावयाचं आव्हान असेल.

सचिन तेंडुलकरप्रमाणे पृथ्वी शॉनंही लहान वयातच आपल्या गुणवत्तेचं दर्शन घडवलंय. यामुळे भावी स्टार क्रिकेटपटू गवसल्याची चर्चा रंगलीय.